शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीड लोकसभा खासदार प्रीतम मुंडेच लढवणार; पंकज मुंडे यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:45 IST

वैद्यनाथ मंदिरासमोरील प्रवचन मंडप सभागृहात महामृत्यंजय जपाने परिक्रमेचा समारोप करण्यात आला

- संजय खाकरेपरळी: बीड लोकसभेची जागा खा .प्रीतम मुंडेच लढवितील, मी खा.प्रीतम मुंडे यांची जागा घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिली. त्या राज्यव्यापी शिव-शक्ती परिक्रमेच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या. यामुळे पंकजा मुंडे लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशा चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव  पंकजा मुंडे यांनी अखेरच्या श्रावण सोमवारी आज सकाळी  प्रभू वैद्यनाथास अभिषेक केला. त्यानंतर  वैद्यनाथ मंदिरासमोरील प्रवचन मंडप सभागृहात महामृत्यंजय जपाने परिक्रमेचा समारोप दुपारी 1 वाजता करण्यात आला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. शिव-शक्ती परिक्रमेचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वागत झाले आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे सर्वत्र नाव आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे. या परिक्रमा यात्रेचे यश गोपीनाथराव मुंडे यांना समर्पित करते, अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या. तसेच प्रीतम मुंडे मागील १० वर्षांपासून खासदार आहेत. त्यांची जागा मी घेणार नाही, हा माझा निर्णय आहे, अशी स्पष्टोक्ती पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली. 

यावेळी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, बंकटराव कांदे, बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,तालुका अध्यक्ष सतीश मुंडे ,भाजपा शहर उपाध्यक्ष महादेव इटके, राजेंद्र ओझा अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टी ,यांच्या इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

अशी होती शिवशक्ती परिक्रमा यात्रा शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची परिक्रमा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने सुरू केली . राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा प्रवास परिक्रमेचा होता या परिक्रमेचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी जंगी स्वागत झाले. 

शिव-शक्ती परिक्रमेचा प्रवास:घृष्णेश्वर ( छत्रपती संभाजीनगर) त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक),भीमाशंकर (जि. पुणे)औंढा नागनाथ (जि. हिंगोली)परळी वैजनाथ (जि. बीड ) ---सप्तश्रृंगी गड वणी (जि. नाशिक), दिंडोरी येथे स्वामी समर्थ केंद्रास भेट, जेजुरी, दुपारी १२.१५ वा.शिखर शिंगणापूर दर्शन (जि. सातारा)कोल्हापूर (जि. कोल्हापूर) येथे अंबामातेचे दर्शन पंढरपूर(जि.सोलापूर), अक्कलकोट . गाणगापूर दर्शन, तुळजापूर (जि. धाराशीव) भवानी देवीचे दर्शन.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBeedबीडBJPभाजपा