शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

बीड अवैध गर्भपात प्रकरण: जेलमधून मनीषा कोठडीत; हसत बसली गाडीत, ना चिंता ना दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 20:14 IST

दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या डॉक्टरच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे.

- सोमनाथ खताळबीड : अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य एजंट असलेल्या मनीषा सानपला जेलमधून काढत दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यावेळी ती हसत गाडीत बसली. कसलीही चिंता अथवा दु:ख तिच्या चेहऱ्यावर नव्हते. तर अगोदरच कोठडीत असलेले मयत शीतल गाडेचा पती, सासरा, भाऊ आणि रक्त तपासणी करणाऱ्या लॅबवाल्याचा मुक्कामही दोन दिवसांनी वाढला आहे. या सर्वांना पुन्हा एकदा गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या डॉक्टरच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे.

शीतल गाडे (वय ३०, रा. बकरवाडी, ता. बीड) या महिलेचा अवैध गर्भपातादरम्यान ५ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणात पिंपळनेरचे उपनिरीक्षक एम.एन. ढाकणे यांच्या फिर्यादीवरून पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. त्यातील सीमा हिने गुन्हा दाखल होताच पाली येथील तलावात आत्महत्या केली होती. तसेच इतर आरोपींना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांच्यासह मनीषाला कारागृहातून बाहेर काढत मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या सर्वांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोन दिवसांपूर्वीच पकडलेल्या सतीश बाळू सोनवणे (रा. जाधववाडी, ता.जि. औरंगाबाद) या शिकाऊ डॉक्टरलाही १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी आहे. या सर्वांना गुरुवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

निदान झालेल्या महिलांचा शोधमनीषा व सतीशने किती महिलांचे गर्भलिंग निदान केले, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. येत्या दोन दिवसांत मनीषाकडून ही यादी मिळण्याची दाट शक्यता आहे. ही यादी मिळाल्यास गर्भपात करणाऱ्यांचे रॅकेट उघड होऊ शकते.

तपास अधिकारी म्हणतात, सीएसने फिर्याद द्यावीया प्रकरणात पिंपळनेरचे पोलीस उपनिरीक्षक ढाकणे हे फिर्यादी आहेत; परंतु तांत्रिकदृष्ट्या आणि पीसीपीएनडीटी कायद्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी फिर्याद देणे अपेक्षित असते. यापूर्वी सुदाम मुंडे प्रकरण आणि जालना येथील डॉ.गवारे प्रकरणात सीएसच फिर्यादी आहेत. यातही त्यांनी पुढे येऊन तक्रार दिल्यास प्रकरण आणखी मजबूत होईल, असा विश्वास तपास अधिकारी बाळासाहेब आघाव यांनी व्यक्त केला. तसेच सतीश सोनवणेच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त केल्याचेही ते म्हणाले.

मी तक्रार द्यायला तयार - डॉ.साबळेया प्रकरणात आम्ही फिर्यादी व्हावे, अशी पोलिसांची अपेक्षा असेल तर मी तक्रार द्यायला तयार आहे. या प्रकरणाचा छडा लागावा आणि दोषींना शिक्षा व्हावी, हीच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.

आणखी आरोपी वाढणारया प्रकरणात शीतलची रक्त तपासणी वासुदेव गायके यांच्या लॅबमध्ये केली होती; परंतु तो एक एजंट असून रिपोर्टवर त्याच्या पत्नीची स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात तिलाही आरोपी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच डॉ.गवारे प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याचीही दाट शक्यता आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी