शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

बीडमध्ये मुलाने वाहतूक नियम तोडल्यास पालकाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 12:28 IST

मुलगा - मुलगी लाडाचे असल्यामुळे १८ वर्षाच्या आतच त्यांच्या हाती दुचाकीची चावी दिली जाते.

ठळक मुद्देशरीर व मनाने सुदृढ नसलेल्या या बालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. सोमवारपासून यानिमित्त विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

बीड : मुलगा - मुलगी लाडाचे असल्यामुळे १८ वर्षाच्या आतच त्यांच्या हाती दुचाकीची चावी दिली जाते. मात्र, शरीर व मनाने सुदृढ नसलेल्या या बालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी आता मुलाने नियम तोडल्यास पालकाला दंड केला जाणार आहे. सोमवारपासून यानिमित्त विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. तत्पूर्वी तीन दिवस जनजागृती केली जाणार आहे.

माझी मुलगा - मुलगी कॉलेजला जाते. आता ती मोठी झाली. त्यांना दुचाकीची अत्यंत गरज आहे. आणि मुलाच्या हट्टापायी पालक त्यांना हजारो रुपयांची नवी कोरी दुचाकी घेऊन देतात. त्यांना वाहतुकीच्या कसल्याही नियमांची कल्पना नसते. आपल्याला पोलीस पकडत नाहीत या गैरसमजूतीतून ते सुसाट वाहने पळवितात. गर्दी व अचानक समोरुन वाहने आल्यास त्यांना काय करावे हे समजत नाही. कारण शरीर व मनाने ते तितकेसे सुदृढ झालेले नसतात. अशा परिस्थितीत अपघात होण्याची दाट शक्यता असते.

अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र, आता हे टाळण्यासाठी वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेऊन १८ वर्षाखालील मुले वाहने चालविताना दिसल्यास त्यांना अडविले जाईल. त्यानंतर पालकांना बोलावून घेतले जाईल. मुलाला ५००, तर पालकाला कलम ४ (१) १८१ मो. वा. का. नुसार एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे परवाना नसताना वाहन चालविण्यास दिल्यावर मालकाकडून हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

शाळा- महाविद्यालयात करणार जनजागृतीसध्या शाळा - महाविद्यालयांना सुटी आहे. ते सुरु झाल्यानंतर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या क्लासेस व इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीसाठी पुढाकार घेतला जाणार आहे. सोमवारपासून मात्र थेट कारवाईला सुरुवात केली जाणार आहे.

पालकाने जागृत रहावे मुलाने नियम तोडल्यास ५००, तर त्याच्या पालकाकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. सोमवारपासून मोहीम हाती घेणार आहोत. जनजागृतीबरोबरच कारवाया केल्या जातील. पालकांनीही याबाबत जागृत व्हावे. मानसिकता बदलून सहकार्य करावे. अपघात टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेत आहोत.- सुरेश बुधवंत, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीBeedबीडPoliceपोलिस