- नितीन कांबळेकडा (बीड): आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे मंगळवारी मध्यरात्री एका बंद घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. कुटुंब बाहेरगावी गेल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील संसार उपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्टेशनरी जळून खाक झाली आहे. या आगीत गोपीनाथ गाडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेजारील संजय कोहक यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.
काय आहे नेमकी घटना?दौलावडगाव येथील चर्मकार समाजाचे नेते गोपीनाथ गाडे हे मागील आठ दिवसांपासून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर येऊ लागले. शेजाऱ्यांनी ही आग पाहिल्यानंतर तात्काळ अंभोरा पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दल आणि ग्रामस्थांची मदतअहिल्यानगर येथील अग्निशमन दल, अंभोरा पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व वस्तूंची राख झाली होती. गोपीनाथ गाडे यांच्या घराशेजारीच संजय कोहक यांचे घर असल्याने त्यांच्या पडवीपर्यंत आग पोहोचली आणि त्यांचेही संसार उपयोगी साहित्य जळाले. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Web Summary : A midnight fire in Daulavadgaon destroyed a locked house belonging to Gopinath Gade, who was away. Valuables worth lakhs were lost. Neighbor Sanjay Kohak's house also suffered damage. The fire was extinguished with the help of fire services and locals; the cause is unknown.
Web Summary : दौलवडगाँव में आधी रात को गोपीनाथ गाडे के बंद घर में भीषण आग लग गई, जो बाहर थे। लाखों का सामान जल गया। पड़ोसी संजय कोहक के घर को भी नुकसान हुआ। अग्निशमन सेवाओं और स्थानीय लोगों की मदद से आग बुझाई गई; कारण अज्ञात है।