शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:43 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या टीमवर्कमुळे बीडचा दिल्लीत सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत बीड जिल्हा संपूर्ण देशात अव्वल ठरला आहे. जिल्हयाला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला असून नागरी सेवा दिनानिमित्त दिल्ली येथे शनिवारी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा पाठपुरावा, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केलेले प्रशासनाचे नेतृत्व, महसूल, कृषी विभाग, सर्व बॅँका आणि कॉमन सर्व्हिस सेंटर चालकांनी प्रयत्न केल्यामुळे बीडचा शनिवारी दिल्लीत सन्मान होत आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये केलेल्या उत्कृष्ट अंमलबजावणीबद्दल प्रधानमंत्री उत्कृष्ट लोक प्रशासन पुरस्कार जिल्हयाला जाहीर झाला आहे. जिल्ह्यात २०१६ च्या खरीप हंगामात १३ लाख ५४ हजार ४९६ शेतकरी विमा योजनेत सहभागी होते. ६ लाख ३३ हजार २८६ हेक्टर विमा संरक्षण क्षेत्र संरक्षित केले होते. यासाठी ५५ कोटी ४६ लक्ष रुपये विमा हप्ता भरण्यात आला होता.

६ लाख २४९ लाभार्थ्यांना २३२ कोटी ८४ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला. तसेच रब्बी हंगामात १ लाख ६१ हजार ७४ शेतकरी सहभागी झाले होते. ९९ हजार ४१ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रासाठी २६२.५७ लाख रुपये हप्ता भरण्यात आला. ७ हजार १२९ लाभार्थ्यांना ४०५.०४ लाख रुपये विमा मंजूर झाला. अशा प्रकारे एकूण १५ लाख १५ हजार ५७० सहभागी शेतकऱ्यांनी ७ लाख ३२ हजार ३२७ हेक्टर विमा संरक्षित क्षेत्र करण्यासाठी ५८०८.५९ लक्ष रुपये विमा हप्ता भरला होता. ६ लाख ७ हजार ३७८ लाभार्थी शेतकºयांना २३६कोटी ८९ लाख एवढा विमा मंजूर झाला.

शेतकरी आणि यंत्रणांचा प्रतिसादगेल्या दोन वर्षांत बीड जिल्हयातील शेतकºयांचा विमा भरण्याकडे सकारात्मक कल दिसला शिवाय शेतकºयांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्यामुळे जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला. शेतकºयांना पीक विमा भरण्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात मी वेळोवेळी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन संबंधित यंत्रणांनी केल्यामुळे हा पुरस्कार जिल्ह्याला मिळाला आहे. - पंकजा मुंडे, पालकमंत्री

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीMarathwadaमराठवाडा