शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस; छोटी धरणे भरल्याने दिलासा, नदी-नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 17:57 IST

दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील छोटी धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे. 

बीड : मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची बीड जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७५ मिमी पाऊस झाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील छोटी धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकांनाही जीवदान मिळाले आहे. बीड जिल्हा तालुका निहाय पाऊस(mm) : पाटोदा-67, आष्टी-105, धारूर-29.7, केज-37, माजलगाव-56, अंबेजोगाई-105, शिरूर कासार-70, परळी-27 वडवणी-72

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पुर आला आहे.  तर आंबेसावळी नदी देखील खळखळून वाहत आहे. बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला असून दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता आहे.

धारूर तालूक्यातील सर्व धरणे भरली दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावाने तालुक्यातील घागरवडा, आरणवाडी, कुंडलीका आणि धारूर साठवण तलाव काठोकाठ भरली आहेत.  तसेच तालुक्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. या पावसाचा पिकांना फायदाच होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. 

नागापूर धरण भरल्याने परळीकरांना दिलासा परळी शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासून पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन सहित सर्व पिकांना जीवनदान मिळाले आहे. वाण धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. वाण  नदीला पूर आला आहे. पावसामुळे  नुकसान काही झाले नसून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील नागापूर धरण भरल्याने परळीकरांची पाणी समस्या दूर झाली आहे.

माजलगाव धरणाचा पाणीसाठी ५० टक्क्यांवर माजलगाव धरण परिसरात मागील 24 तासात 50 मी.मी.पावसाची नोंद झाली. मंगळवारी पहाटे धरण परिसरात जोरदार पाऊस झाला.यामुळे धरणात चांगल्याच पाण्याची वाढ झाली. चोवीस तासापूर्वी धरणात 35 टक्के पाणी साठा होतो तो मंगळवारी दुपारी 50 टक्के झाला होता.यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

आष्टीतील मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊससकाळपासून पाऊस सुरू असल्याने जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.मच्छिंद्र गड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून रस्ते ही वाहून गेली आहेत.नदी काठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असून भिजून मोठे नुकसान झाल्याने या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

गेवराईत गोदावरी-सिंधफनाच्या पाणी पातळीत वाढगेवराई तालुक्यात सोमवारी दिवसभर रिमझिम पावसानंतर मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली. यातच हिरडपुरी उच्च पातळी बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचे सातत्य आणि मोठा विसर्ग यामुळे गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे. तसेच सिंधफना नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले वडवणी तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने सोन्नाखोटा येथील उर्ध्व  कुंडलिका मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. यामुळे 100% पाणी साठा आरक्षित ठेवून प्रकल्पाचे पाच दरवाजे मंगळवारी पहाटेच्या सुमारास 90 सेमीने उघडण्यात आले. प्रकल्पातून नदीपाञात 12857 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निम्न भागातील कुंडलिका नदीकाठी असणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा  देण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश सिरसेवाड यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसBeedबीडMarathwadaमराठवाडा