शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा हॉलमध्ये घुसून दहावीच्या विद्यार्थिनीला तरुणाची मारहाण; बीडमधील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:02 IST

विद्यार्थिनीला मारहाण केल्याने पालकांचा संताप, डोईठाण केंद्रावरील सुरक्षेचा फज्जा, परिसरात तणाव

- नितीन कांबळे

कडा (जि. बीड): दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला एका तरुणाने थेट परीक्षा हॉलमध्ये घुसून मारहाण केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे केंद्र परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भर हॉलमध्ये विद्यार्थिनीवर हल्लामिळालेली माहिती अशी की, डोईठाण येथील केंद्रावर बीडसांगवी येथील शाळेतील मुली परीक्षेसाठी आल्या होत्या. सकाळी १०:४५ च्या सुमारास सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसलेले असताना, देसूर येथील एका तरुणाने अचानक हॉलमध्ये प्रवेश केला. त्याने तिथे बसलेल्या एका विद्यार्थिनीला काही कळायच्या आत मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर आरोपी तरुणाने तातडीने तिथून पळ काढला.

भयभीत विद्यार्थिनीला अश्रू अनावरया अनपेक्षित हल्ल्यामुळे विद्यार्थिनी प्रचंड भयभीत झाली आणि तिला रडू कोसळले. तिने घडलेला सर्व प्रकार केंद्र संचालक आणि शिक्षकांना सांगितला. शाळा प्रशासनाने तातडीने मुलीच्या पालकांना बोलावून घेऊन घटनेची माहिती दिली. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतानाही एक तरुण थेट हॉलपर्यंत पोहोचलाच कसा, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teen assaults 10th-grade girl in exam hall, Beed incident sparks outrage.

Web Summary : In Beed, a shocking incident occurred where a young man entered an exam hall and assaulted a 10th-grade girl. The girl was terrified and in tears. Parents are questioning security lapses, demanding action. Police investigation is underway.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याssc examदहावीCrime Newsगुन्हेगारी