शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:08 IST

Beed Crime News : गुन्हेगारीमुळे काही दिवसापूर्वी बीड जिल्हा चर्चेत आला होता. आता बीडमध्ये एका मुलाचे पैशांसाठी अपहरण झाल्याचे समोर आले आहे.

Beed Crime News : मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता आणखी एक घटना समोर आली आहे. ५० हजार रुपयांसाठी एक मुलाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. धारूरमध्ये उसने पैसे वसूल करण्यासाठी चार तरुणांनी एका तरुणाचे अपहरण केलं. मुलाच्या घरी फोन करून मुलगा जिवंत हवा असेल तर आताच्या आता ५० हजार रुपये टाका  अन्यथा मुलगा तुम्हाला परत दिसणार नाही अशी धमकी दिली. 

ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात फक्त १० हजार रुपयांच्या उसनवारीवरून तब्बल ८० हजार रुपयांची वसुली करत एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना समोर आली. दरम्यान, आरोपींनी तरुणाच्या आईला फोन करुन धमकी दिल्याचे समोर आले. "मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50 हजार पाठवा, नाहीतर तो कधी दिसणार नाही", अशी धमकी आरोपींनी दिली. 

ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून अपहरण झालेल्या तरुणाचे नाव कृष्णा मैंद असे आहे. कृष्णाने काही महिन्यांपूर्वी धनराज चाटे, पृथ्वीराज राग आणि परमेश्वर आगाव यांच्याकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. आरोपींनी या रकमेवर दिवसाला १ हजार रुपयांचे व्याज लावले होते. याच हिशेबाने व्याजाची रक्कम ८० हजारांवर गेली.पैसे मिळवण्यासाठी कृष्णाचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी कृष्णाच्या आईला फोन करून ५० हजार रुपयांची मागणी केली.

पैसे दिले नाहीतर मुलाला सोडणार नाही, अशी धमकी त्या आरोपींनी आईला फोन करुन दिल्याचे म्हटले आहे. तरुणाच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी धारुर पोलिसांनी तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोघेजण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस