शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केज नगरपंचायतचा ३.६७ कोटींचा घरकुल घोटाळा विधानसभेत गाजला; SIT चौकशी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:18 IST

दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! नमिता मुंदडांनी सरकारला विचारला जाब.

केज/मुंबई: गरीब आणि गरजूंना हक्काची घरे मिळवून देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या केज नगरपंचायतीचा ३.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार शुक्रवारी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला. आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. यावर सरकारने कठोर भूमिका घेत, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल येताच संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आश्वासन दिले आहे.

१५८ धनादेशांद्वारे निधीची पळवापळवीपंतप्रधान आवास योजनेचा ३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक होते. मात्र, तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा निधी नियमबाह्यपणे कंत्राटदार, विविध ट्रेडर्स, फॅब्रिकेटर्स आणि इलेक्ट्रिकल दुकानदारांच्या नावे १५८ धनादेशांद्वारे वर्ग केला. नमिता मुंदडा यांनी या घोटाळ्याचा पाढा वाचताच सभागृहात एकच खळबळ उडाली.

SIT आणि ACB चौकशीची घोषणाआमदार मुंदडांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना ८ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा अहवाल प्राप्त होताच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तसेच अपहाराच्या रकमेची व्याजासह वसुली करण्यासाठी 'एसआयटी' (SIT) आणि 'एसीबी' (ACB) चौकशी लावली जाईल, अशी घोषणा राज्यमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे केज नगरपंचायतीसह बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kej Nagar Panchayat's Housing Scam Echoes in Assembly; SIT Investigation Ordered

Web Summary : Kej Nagar Panchayat's ₹3.67 crore housing scam, involving illegal fund diversion, rocked the state assembly. Government orders SIT and ACB investigations, promising criminal charges and suspensions.
टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग