बीड : शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेच्या पाइपलाइनचे काम करणाऱ्या एका कंत्राटी मजुरावर गोळ्या झाडून काेयत्याने तोंडावर वार करीत निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोळ्या झाडून आरोपी विशाल संजय सूर्यवंशी फरार झाला होता. त्याचा शोध चार पथकांकडून घेतला जात आहे.
बीड नगरपालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या हर्षद तुळशीराम शिंदे या मजुराचा खून करण्यात आला. बीड शहरापासून हद्दवाढ झालेल्या अंकुशनगर भागातील साई-पंढरी लॉन्स व मंगल कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाइपलाइन दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा हर्षद शिंदे व त्याचा एक अन्य सहकारी खोदून पाइपलाइनचे काम करत असताना तेथे विशाल संजय सूर्यवंशी दुचाकीवरून आला. त्याने बंदुकीमधून तीन गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या चुकविल्या. मात्र, एक गोळी बरगडीत लागल्याने जीव वाचविण्यासाठी हर्दष हा जवळच असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमधील शेडच्या पाठीमागे लपला असता विशाल त्याचा पाठलाग करत तेथे गेला. हर्षदच्या तोंडावर वार करून खून करून आरोपी विशाल हा पळून गेला होता.
या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणातून हा खून झाला की यामागे काही जुना वाद आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
बुधवारी झाले अंत्यसंस्कारमयत हर्षद शिंदे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन बुधवारी दुपारी करण्यात आले. त्यानंतर बीड शहरातील अंकुशनगर भागातील स्मशानभूमीत दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. हर्षद शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
Web Summary : In Beed, a laborer was shot and killed. Police are searching for the suspect, Vishal Suryavanshi. The victim, Harshad Shinde, was working on a pipeline when attacked. Investigations are underway to determine the motive behind the murder.
Web Summary : बीड में एक मजदूर की गोली मारकर हत्या कर दी गई। पुलिस संदिग्ध विशाल सूर्यवंशी की तलाश कर रही है। पीड़ित हर्षद शिंदे पाइपलाइन पर काम कर रहे थे जब उन पर हमला किया गया। हत्या के पीछे के मकसद का पता लगाने के लिए जांच जारी है।