शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर माझा दवाखाना; बीड जिल्हा रूग्णालय राज्यात अव्वल, पटकावले लाखाचे बक्षिस

By सोमनाथ खताळ | Updated: January 31, 2024 21:51 IST

तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ११ उपकेंद्रांनाही मिळाले बक्षिस

बीड : सुंदर माझा दवाखाना या कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावरून आरोग्य संस्थांची तपासणी करण्यात आली होती. यात कायाकल्प चेकलीस्टच्या आधारावर जिल्हा रूग्णालय राज्यात प्रथम क्रमांकावर आले असून एक लाख रूपयांचे बक्षिसही पटकावले आहे. यासोबतच तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ११ उपकेंद्रालाही बक्षिसे मिळाली आहेत.

७ एप्रिल २०२३ या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरावरून आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये, जिल्हा रूग्णालय यांची तपासणी करण्यात आली होती. राज्यस्तरीय समितीने याची तपासणी केल्यानंतर बीड जिल्हा रूग्णालयाला सेवा, सुविधांमध्ये ९८ टक्के गुण मिळाले. त्यामुळे जिल्हा रूग्णालय राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिले. त्यांना आता १ लाख रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. सोबतच घाटनांदूर, राजेगाव आणि कडा आरोग्य केंद्रालाही प्रत्येकी २० हजार रूपये बक्षिस मिळणार आहे.  वाघाळा, आष्टा (हरिनारायण), तळेगाव, कोळपिंप्री, पाचेगाव, मस्साजोग, हारकी लिंबगाव, नागदरा, दासखेड, खोकरमोहा आणि चिंचाळा या उपकेंद्रांनाही प्रत्येकी १० हजार रूपये बक्षिस दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शखेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.अमृता मुळे, समन्वयक डॉ.जयश्री दराडे, सहायक बापू निकाळजे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते.