गॅरेजचालकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:37 IST2021-02-09T04:37:11+5:302021-02-09T04:37:11+5:30

अंबाजोगाई : तहसीलदारांचा पंचनामा सुरू असताना समोर थांबलेल्या गॅरेजचालकाला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी अंबाजोगाई ...

Beating the garage driver; Crime on eight people | गॅरेजचालकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा

गॅरेजचालकास मारहाण; आठ जणांवर गुन्हा

अंबाजोगाई : तहसीलदारांचा पंचनामा सुरू असताना समोर थांबलेल्या गॅरेजचालकाला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी अंबाजोगाई ते साखर कारखाना रोडवर घडली. हा सर्व प्रकार तहसीलदारांच्या समोर घडल्यामुळे कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महेश गुरुलिंगअप्पा गाडवे (रा. माऊलीनगर, यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई) असे मारहाण झालेल्या गॅरेजचालकाचे नाव असून, त्यांचे अंबाजोगाई ते साखर कारखाना रोडवरील डॉ. लहाने यांच्या जागेत गॅरेज आहे. शनिवारी सायंकाळी तहसीलदार यांच्याकडून डॉ. लहाने यांच्या जागेत पंचनामा सुरू होता. यावेळी बाहेरचे बरेच लोक जमा झाल्याने तहसीलदारांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी शैलेश चव्हाण, रवी देशमुख, उमेश लुकडे, गोपाळ मस्के आणि अनोळखी चार जण महेश गाडवे हे देखील बाहेरचे असून, त्यांना बाहेर काढा म्हणू लागले. मी बाहेरचा नसून माझे इथे गॅरेज आहे, असे गाडवे यांनी सांगताच, त्या आठ जणांनी काठी, ऊस, लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी महेश गाडवे यांच्या फिर्यादीवरून आठ जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. फौजदार सोनेराव बोडखे करत आहेत.

Web Title: Beating the garage driver; Crime on eight people