ऊसतोडीच्या उचलीवरून कुऱ्हाडीने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:46+5:302021-07-18T04:24:46+5:30
--------- अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल बीड : दुचाकीवरून जाताना गतिरोधकावर ब्रेक न लावल्याने दुचाकी आदळून सुदामती चंद्रकांत कदम ...

ऊसतोडीच्या उचलीवरून कुऱ्हाडीने मारहाण
---------
अपघातात महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
बीड : दुचाकीवरून जाताना गतिरोधकावर ब्रेक न लावल्याने दुचाकी आदळून सुदामती चंद्रकांत कदम (रा, नाळवंडी, ता. बीड) या खाली पडल्याने जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. १५ जून रोजी लोणाळा फाट्याजवळ हा अपघात झाला होता. याप्रकरणी रंगनाथ मोहन राऊत यांच्या फिर्यादीवरून १६ जुलै रोजी दुचाकीचालक संतोष सुखदेव राऊतविरुद्ध तलावाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोउपनि. माने करीत आहेत.
-----------
कारची दुचाकीला धडक, एक ठार
बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील गणेश अप्पा कडिर्ले (रा. अल्लनवाडी ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हे ठार झाले. ४ जुलै रोजी आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी शिवारात हा अपघात घडला होता. याप्रकरणी अंबादास दिनकर सत्रे यांच्या फिर्यादीवरून कार (क्र. एमएच ०४ ईझेड २१२१) चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोना देवडे करीत आहेत.
-----------
पाणी अडविल्यावरून दांपत्याला दगडाने मारहाण
बीड : घरासमोरील शेतातील पावसाचे पाणी का अडवले अशी विचारणा केली म्हणून दिलीप ढवळे व त्यांच्या पत्नीस दगडाने मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथे १५ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार बाळासाहेब ढवळे, अर्चना ढवळे, विजयकुमार ढवळे, शुभम ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना बांगर करीत आहेत.