शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

बीडकरांना मिळणार चार दिवसांआड पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच ...

ठळक मुद्देपालिकेकडून नियोजन सुरू : २६५ लिकेज दुरुस्त करून थांबविला अपव्यय; अभियंत्यांकडून नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुबलक पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी ते नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. हाच धागा पकडून पालिकेने अभ्यास केला आहे. एका महिन्यात तब्बल २६५ लिकेज दुरुस्ती करुन पाणी अपव्यय थांबविण्याबरोबरच बीडकरांना चार दिवसाआड पाणी देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होणार असल्याचे पालिकेतील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पालिकेचे हे आश्वासन कितपत खरे ठरेल? हे वेळच ठरवेल.

यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव व बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरण तुंडूंब भरले. एवढे पाणी असतानाही केवळ नियोजनाअभावी बीडकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. मुख्य जलवाहिनीसह शहरातील अंतर्र्गत जलवाहिनीला ठिकठिकाणी लिकेज आहेत. यामुळे पाणी कमी दाबाने येण्याबरोबरच पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतो.

सध्या बीड शहरात हद्दवाढ भागात वेळेवर पाणी येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी येते, अशा तक्रारी आहेत. तसेच शहरातही आठ ते दहा दिवसाला पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढत्या तक्रारी पाहून पालिकेने अभ्यास करून मुख्य कारणे शोधली. यामध्ये माजलगाव ते बीड, बिंदुसरा धरण ते बीड अशा मुख्य जलवाहिनीला तब्बल ४०० वर लिकेज असल्याचे समोर आले.

या लिकेजमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे समजले. त्यानंतर तात्काळ पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी बैठक घेतली आणि लिकेज दुरूस्तीचे काम हाती घेतले. गतीने काम केल्यामुळे केवळ एका महिन्यात १५ मोठ्या लिकेजसह २६५ छोटे लिकेज दुरूस्त करण्यात आले. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबला आहे.हेच पाणी आता नागरिकांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सतिष दंडे, राहुल टाळके, निखील नवले, पी.आर.दुधाळ आदींनी हे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच पर्यवेक्षकांची नियुक्तीयापूर्वी पालिकेत दहा सुपरवायझर होते. एवढे लोक असतानाही केवळ समन्वय आणि संवाद नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. परंतु आता यापैकी केवळ पाचच जण ठेवण्यात येणार असून त्यांच्याकडून पूर्ण नियोजन करून घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बीडकरांना यावर्षी तरी सुरळीत पाणीपुरवठा करावा, तसेच होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून जोर धरु लागली आहे.