काळजी घ्या ! कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता, प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:45 AM2020-11-22T11:45:36+5:302020-11-22T11:50:01+5:30

नवी रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूदर रोखण्यात अद्यापही प्रशासन व आरोग्य विभागाला यश आलेले दिसत नाही.

Be careful! The possibility of a second wave of corona virus infection, the District administration and the health department on alert | काळजी घ्या ! कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता, प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क

काळजी घ्या ! कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता, प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क

Next
ठळक मुद्देआतापर्यंतच्या अनुभवाच्या बळावर पुढील उपाययोजनाआजही जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.१४ टक्के एवढा आहे. 

बीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाबतची स्थिती नियंत्रणात आलेली दिसत असली तरी दुसरी लाट येणाची शक्यता असल्याने भीती व्यक्त केली जात आहे. आलेल्या प्रत्येक संकटाशी दोन हात करण्याची तयारी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दर्शविली आहे. आतापर्यंतच्या अनुभवाच्या बळावर पुढील उपाययोजना करण्यासाठी जिल्हा शासन सतर्क झाल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ४०७ संशयितांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील १ लाख २९ हजार ४१३ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १४ हजार ९९४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मागील काही दिवसांची सरासरी काढली, तर दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. नवी रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूदर रोखण्यात अद्यापही प्रशासन व आरोग्य विभागाला यश आलेले दिसत नाही. आजही जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.१४ टक्के एवढा आहे. दरम्यान, पहिल्या टप्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना व संकटावर मात करण्याचा अनुभव प्रशासनाला आला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या दुसऱ्या लाटेलाही सहजपणे तोंड देण्याची प्रशासनाची तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत या लढ्याला तोंड देऊन यश संपादन करण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. प्रशासन सतर्क असले तरी नागरिकांनीही संसर्ग होऊ नये आणि तो वाढू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाला सहकार्य करण्यासह सूचनांचे पालन करण्याची गरज  आहे. कोविड १९ च्या नियमांचा विसर पडल्यागत नागरिक वागत असल्याने प्रशासनालाही आता कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत. नाईट कर्फ्यूची शक्यता वर्तविली जात आहे.

सामाजिक अंतर, मास्कचा वापर गरजेचा
कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी पहिल्याच सूचना वारंवार सांगून त्या अमलात आणण्यासाठी आवाहन केले जात आहे. सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार सॅनिटायझर व तोंडाला मास्क लावण्याबाबत सांगितले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रम कमी लोकांत घेऊन त्यात कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, तसेच प्रशासनाने सामान्यांच्या हितासाठी दिलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दुसरी लाट जास्त क्षमतेने प्रभावी नसली तरी काळजी घेण्याची गरज आहे. वृद्ध व लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे.

सेंटर, डॉक्टर्स, औषधसाठा उपलब्ध
दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने डॉक्टर्स, कोविड केअर सेंटर व मुबलक औषधसाठा उपलब्ध केला जात आहे. अगोदरच यंत्रणा सतर्क असली तरी त्यात आणखी वाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ सांगतात. आरोग्य विभाग व प्रशासन याचा सामना करण्यासाठी सतर्क आहे. सेंटर, औषधसाठा, मनुष्यबळ पूर्ण आहे. आतापर्यंत दोन हात केले. यापुढेही लढण्यास तयार राहू. यात जिंकूनही दाखवू.
-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Web Title: Be careful! The possibility of a second wave of corona virus infection, the District administration and the health department on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.