वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 13:18 IST2017-12-24T13:18:38+5:302017-12-24T13:18:52+5:30
वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व माजी सचिव बापुसाहेब देशमुख यांचे आज रविवारी सकाळी आकरा वाजता खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 95 वर्षाचे होते.

वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बापुसाहेब देशमुख कालवश
परळी: येथील वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व माजी सचिव बापुसाहेब देशमुख यांचे आज रविवारी सकाळी आकरा वाजता खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 95 वर्षाचे होते.
बापुसाहेब देशमुख यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना एका खाजगी रूग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले होते उपचार चालु असतांनाच आज सकाळी अकरा वाजता निधन झाले आहे.
बापुसाहेब देशमुख यांनी वैद्यनाथ देवस्थानचे विश्वस्त म्हणुन अनेक वर्षे काम पाहिले तसेच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद ही काही वर्षे भूषविले, सरस्वती शिक्षण संस्थेचे सदस्य होते तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केले होते त्या माध्यमातून दादांनी परळी नगर परिषद चे उपनगराधयक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख यांचे ते वडील होते तसेच वैद्यनाथ मंदीराचे सचिव राजेश देशमुख यांचे ते चुलते होते , बापूसाहेब देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुले व पाच मुली सुना नातवंडे परिवार आ.हे