गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:46+5:302021-01-09T04:28:46+5:30
वीजपुरवठा विस्कळीत बीड : रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासत आहे. यामुळे शेतकरी विद्युत ...

गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास
वीजपुरवठा विस्कळीत
बीड : रबी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासत आहे. यामुळे शेतकरी विद्युत पंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. वेळेवर व सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाणी देण्यास अडचणी येत आहेत.
गस्त वाढवा
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.