एसटीमध्येच प्रसूती, बाळ दगावले, बीडमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 06:12 IST2018-06-16T06:12:26+5:302018-06-16T06:12:26+5:30

दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून सुटी दिलेल्या महिलेची शुक्रवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात येत असताना बसमध्येच प्रसूती झाली.

baby Child Death in St | एसटीमध्येच प्रसूती, बाळ दगावले, बीडमधील घटना

एसटीमध्येच प्रसूती, बाळ दगावले, बीडमधील घटना

बीड : दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून सुटी दिलेल्या महिलेची शुक्रवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात येत असताना बसमध्येच प्रसूती झाली. ही घटना तालुक्यातील जरुड फाट्यावर घडली. दुर्दैवाने यामध्ये बाळ दगावले असून, आईवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
वर्षा देवकते असे महिलेचे नाव आहे. त्या बाळंतपणासाठी सासरवाडी आसरडोह येथून माहेरी हिवरा पहाडी (ता. बीड) येथे आल्या होत्या. दिवस भरल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु कळा न आल्याने डॉक्टरांना घरी जायला सांगितले. शुक्रवारी सकाळी प्रसवकळा येण्यास सुरुवात झाल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ बसमधून रुग्णालयात आणण्याचा प्रयत्न केला. जरुड फाट्याजवळ बस आली असता कळा वाढल्याने चालकाने बस बाजूला थांबवली. बसमधील इतर महिलांनी पुरुषांना खाली उतरवत तिची प्रसूती बसमध्येच केली. जन्मल्यानंतर बाळ रडले नाही त्यामुळे नातेवाईकांनी आई व बाळाला जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल केले. डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले.
 

Web Title: baby Child Death in St