बाबासाहेब घोळवे सेवानिवृत्त: दिंद्रुड ठाण्यात निरोप - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:33+5:302021-07-02T04:23:33+5:30
घोळवे मागील ३२ वर्षांपासून पोलीस सेवेत कर्तव्यात होते. त्यांनी बीड, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई, व दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे कर्तव्यात ...

बाबासाहेब घोळवे सेवानिवृत्त: दिंद्रुड ठाण्यात निरोप - A
घोळवे मागील ३२ वर्षांपासून पोलीस सेवेत कर्तव्यात होते. त्यांनी बीड, माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई, व दिंद्रुड पोलीस स्टेशन येथे कर्तव्यात असतांना अनेक अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. कित्येक अकस्मात गुन्ह्यांचा उलगडा करण्यात घोळवे यांचा हातभार लागलेला आहे.
अंबाजोगाई येथील अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरणातील महिलेच्या हत्या प्रकरणात घोळवे यांचे मोठे तपासकामी योगदान राहिले आहे. गेवराई येथील दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी ते एका वीटभट्टीवर वेषांतर करून तीन दिवस कामावर राहिले होते. सदर प्रकरणातील गुन्ह्याचा उलगडा करण्याबद्दल घोळवे यांना बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नावाजले होते. त्यांची गतवर्षीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली.
010721\01bed_11_01072021_14.jpg