तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला, पाचजणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:38 IST2021-08-21T04:38:14+5:302021-08-21T04:38:14+5:30
... जावयाला मारहाण, पत्नीलाही घेऊन गेले गेवराई : आम्हाला लग्न मान्य नाही, असे म्हणत जावई व त्याच्या कुटुंबातील लोकांना ...

तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला, पाचजणांवर गुन्हा
...
जावयाला मारहाण, पत्नीलाही घेऊन गेले
गेवराई : आम्हाला लग्न मान्य नाही, असे म्हणत जावई व त्याच्या कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी रानमळा येथे घडली. अविनाश जालिंदर थोरात (वय २६) असे त्या जावयाचे नाव आहे. त्यांच्या घरात घुसून सासूरवाडीतील लोकांनी शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी मुलगी चांदणी हीस घेऊन जाणार असल्याचे सांगितले. अविनाशने विरोध केल्यावर त्यास मारहाण करण्यात आली. यावेळी अविनाशच्या आई-वडिलांसह पत्नीलाही मारहाण केली. जाताना ते पत्नीलाही घेऊन गेले. गेवराई ठाण्यात जनाबाई सावंत, जालिंदर सावंत (दोघे रा. गुलबर्गा, कर्नाटक) व लक्ष्मीबाई शिंदे, अविनाश शिंदे (दोघे रा. अचानकनगर) यांच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
....
माजलगावात व्यापाऱ्याची दुचाकी लंपास
माजलगाव : येथील जुना मोंढा भागातून व्यापारी लतीफ याकुब नाईक (रा.एमएसईबी रोड) यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच ४४ जे - ६५७४) चोरट्यांनी हँडलचे लॉक तोडून पळवून नेली. २० जुलैरोजी ही घटना घडली. याप्रकरणी लतीफ याकुब नाईक यांच्या तक्रारीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
...