शेतीच्या बांधावर सेंद्रिय शेतीचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:25+5:302021-07-02T04:23:25+5:30
शिरूर कासार : कृषी दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर झालेल्या कार्यक्रमात ...

शेतीच्या बांधावर सेंद्रिय शेतीचा जागर
शिरूर कासार : कृषी दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या बांधावर झालेल्या कार्यक्रमात महिला बचत गटाने सेंद्रिय शेतीचा जागर करत सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्त्व सांगितले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती उषा सरवदे, तर प्रमुख म्हणून तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे, माजी सभापती निवृत्ती बेदरे, उपसभापती ॲड. प्रकाश बडे, माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील, गटविकास अधिकारी आर. बी. बागडे, कृषी अधिकारी बांगर, आर. बी. पाटील, कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके, एस. बी. करंजकर उपस्थित होते.
हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कैलास राजबिंडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी वारणी येथील महिला बचत गटांच्या मीरा गिरी यांनी स्वत: पिकवलेल्या भाज्या सेंद्रिय खतावरच्या असून, आज सेंद्रिय शेतीची खरी गरज असल्याचे सांगितले. रासायनिक खत व औषधीवर वाढता खर्च होऊनही आरोग्याला बाधक ठरत असल्याने सेंद्रिय शेती करूनच शेतकऱ्यांना आपली प्रगती साध्य करता येईल, असेही सांगितले. ईस्राईल दौरा करून आलेले शेतकरी विष्णू बेदरे यांनी दोन्ही देशांतील शेतीचा तुलनात्मक बदल सांगितला.
तहसीलदार बेंडे यांनी शेतीला जोडधंदा देत कमी खर्चात, कमी श्रमात अधिक उत्पादन घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी महिला बचत गटाच्या शेतकरी महिला सुनीता बडे, पुष्पा कुल्थे, प्रतिभा जगताप, जयश्री गिरी, रत्नमाला केदार, लंका बटुळे, आशा केदार, जयश्री घुले, आशा फुंदे, पुष्पा केदार आवर्जून उपस्थित होत्या तसेच किरण देसरडा, भाऊसाहेब आघाव, आप्पा फरताडे, रमेश थोरात, राजगुडे, संतोष शेळके तसेच शेतकरी उपस्थित होते.
कृषिदिन हा आजवर कार्यालयात साजरा होत असे. परंतु, तो शेतात बांधावर होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे अशी संकल्पना कृषी सहायक कविता ढाकणे यांनी मांडली. एस. डी. वाघुले, ए. डी. मिसाळ, आर. एच. शिंदे यांसह कृषी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राठोड यांनी केले. संजय फरताडे यांनी आभार मानले.
010721\1559-img-20210701-wa0025.jpg
कृषी दिनाचे औचित्य साधून बांधावर मार्गदर्शन