कोरोनाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:35+5:302021-02-07T04:31:35+5:30
तुरीची आवक वाढली अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या मोंढा बाजारात सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

कोरोनाविषयी जनजागृती
तुरीची आवक वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या मोंढा बाजारात सध्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला होता. तसेच यावर्षी चांगला पाऊस पडल्याने तुरीचे उत्पादन बहरले होते. तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव यावर्षी कमी राहिला. परिणामी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाले. आता तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे जनावरे मुख्य रस्त्यातही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसूनही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
अंबाजोगाई : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते.परिणामी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढते.
गारठा वाढला
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले आहे. गायब झालेली थंडी पुन्हा वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर तालुक्यात विविध भागात वाढत्या थंडीमुळे जनजीवनही विस्कळीत होत आहे. सकाळी लवकर सुरू होणारे व्यवहार थंडीमुळे उशिरा सुरू होत आहेत.