शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड-परळी मार्गावर ऑटोरिक्षा उलटला; चालक बचावला, पण त्याच्या शेजारचा प्रवासी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:55 IST

लग्न आटपून घरी परतत होते, अन् नियतीने घात केला; अपघातानंतर रिक्षाचा चालक फरार!

परळी (बीड): गंगाखेड येथे लग्नाच्या समारंभातून आनंदाने परळीला परतणाऱ्या राऊत कुटुंबावर काळाने घाला घातला. गंगाखेड–परळी मार्गावरील निळा पाटी परिसरात ऑटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात परळी शहरातील बबनराव राऊत (वय ६०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परळी शहरात शोककळा पसरली आहे.

आनंदाचा प्रवास ठरला शेवटचापरळी शहरातील सुभाष चौक येथे बबनराव राऊत हे केश कर्तनालयाचे दुकान चालवत होते. सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळात ते परिचित होते. शुक्रवारी सकाळी ते आपल्या नातेवाईकांसह गंगाखेड येथील एका लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारी लग्न आटोपून परत येण्यासाठी गंगाखेड बसस्थानकासमोर त्यांनी परळीकडे जाणाऱ्या ऑटोरिक्षात जागा पकडली. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास गंगाखेडजवळच निळा पाटीजवळ हा ऑटोरिक्षा अचानक उलटला. ऑटोरिक्षामध्ये चालकासह एकूण दहा प्रवासी होते.

बचावलेला चालक फरार, त्याच्या शेजारचा प्रवासी दगावलाचालकाच्या शेजारी बसलेले बबनराव राऊत यांना रिक्षा उलटल्याने हँडलचा जोरदार मार लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात होताच रिक्षा चालक तातडीने घटनास्थळावरून पसार झाला. बबनराव राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे परळीतील नगरसेवक पदाचे उमेदवार श्रीनिवास राऊत यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली असा मोठा परिवार आहे. उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. नातेवाईकांच्या लग्नाच्या आनंदाच्या दिवशीच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा झालेला हा दुर्दैवी अंत परळी शहराला हळहळ लावणारा ठरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Auto Accident on Gangakhed-Parli Route: One Dead, Driver Flees

Web Summary : A joyous return from a wedding turned tragic when an auto-rickshaw overturned near Gangakhed-Parli. Babanrao Raut, 60, from Parli, died. The driver fled. Raut, a barber and father of a local politician, leaves behind his wife, son, and two daughters. The accident cast a pall of gloom.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याAccidentअपघातDeathमृत्यू