मशागत करताना खांबाच्या तारेत औत अडकला; विद्युत धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 18:08 IST2023-07-01T18:08:21+5:302023-07-01T18:08:43+5:30
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील घटना

मशागत करताना खांबाच्या तारेत औत अडकला; विद्युत धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू
- नितीन कांबळे
कडा: शेतात मशागत करताना खांबातून विद्युत धक्का बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी बीडसावंगी येथे घडली. बबन जयवंत जाधव ( ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्या शेतात पेरणीपूर्वीची मशागत सुरू आहे. बबन जयवंत जाधव हे शेतकरी देखील आपल्या शेतात मशागत करत होते. यावेळी शेतातील खांबास आधार असलेल्या तारेत औत अडकला. खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने औतातून त्याचा धक्का जाधव यांना बसला. यात बबन जाधव यांचा मृत्यू झाला. तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची वार्ता समजताच बीडसावंगी गुंडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.