प्रेक्षक गॅलरी कोसळून एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:11 IST2019-02-20T00:10:46+5:302019-02-20T00:11:01+5:30
शिवजन्मोत्सवानिमित्त कलापथकांची प्रात्यक्षिके सुरु असताना पुरुषांची गॅलरी अचानक कोसळून एक जण जखमी झाला असून त्यास औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

प्रेक्षक गॅलरी कोसळून एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : शिवजन्मोत्सवानिमित्त कलापथकांची प्रात्यक्षिके सुरु असताना पुरुषांची गॅलरी अचानक कोसळून एक जण जखमी झाला असून त्यास औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले. शहरातील बाजारतळ परिसरात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले होते. सकाळी १० वाजेपासून दांडपट्टा, तलवारबाजी, लेझीमसह विविध कला पथकांचे कार्यक्र म सुरु होते. हे कार्यक्रम पाहण्यासाठी आयोजकांनी दोन्ही बाजूने प्रेक्षक गॅलरी उभारली होती. एका बाजूने चारशे ते पाचशे महिला तर दुस-या बाजूने चारशे ते पाचशे पुरूषांसाठी लोखंडाची गॅलरी बनवण्यात आली होती. पे्रक्षकांच्या गर्दीमुळे गॅलरी खचाखच भरली होती. कार्यक्र म सुरु असताना दुपारी १२ च्या सुमारास अचानक एका बाजुची गॅलरी कोसळायला सुरूवात झाली. पाहता पाहता पुरूषांची संपूर्ण गॅलरी कोसळली. यात शहरातील मेन रोड भागातील रहिवासी व गोळ्या , बिस्किटांचे व्यापारी विजय सदाशिवराव राजूरकर (वय ४५) यांच्या खांद्याला व डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना तातडीने येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात नेण्यात आले.