भाजपच्या माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला; चालकासह संगीता ठोंबरे जखमी
By सोमनाथ खताळ | Updated: August 28, 2024 21:01 IST2024-08-28T20:41:44+5:302024-08-28T21:01:43+5:30
Attack on Sangita Thombare: केज तालुक्यातील दहीफळ वडमावली येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे गेल्या होत्या.

भाजपच्या माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला; चालकासह संगीता ठोंबरे जखमी
मधुकर सिरसट
केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीताताई ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड मावली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन अरण्यासाठी गेल्या मद्यधुंद तरुण विजय गदळे यांनी त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांची गाडी फोडली.या घटने चालकासह ,संगीता ठोंबरे जखमी झाल्या आहेत...
केज तालुक्यातील दहीफळ वडमावली येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे गेल्या होत्या. अभिवादना नंतर ऋषी गदळे या कार्यकर्त्याच्या घरी चहा,पानासाठी त्या जीपमधुन जात असताना सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेतील विजय उत्तमराव गदळे यांनी त्यांचेशी असभ्य भाषेत बोलुन,त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात गाडीचा चालकाच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला.त्या नंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या चेह-यावर लागून त्याही जखमी झाल्या. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आसुन, याप्रकरणी केज पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सीटी स्कॅन करावा लागेल..
या प्रकरणी केज येथील उप जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान घुगे यांचेशी संपर्क साधला आसता प्रा संगीता ठोंबरे यांच्या चेह-यावर दगडाचा मार लागला आसुन त्यांचा सीटी स्कॅन केल्यानंतरच मीळालेल्या अहवालावरुन जखम कीती खोल आहे .हे समजेल अशी माहीती डॉ समाधान घुगे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
रुग्णालयाचा अहवाल येताच गुन्हा नोंद होणार..
या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचेशी संपर्क साधला आसता प्रा संगीता ठोंबरे जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात आल्या होत्या,त्यांना उपजिल्हा रूगणालयात तातडीने पाठविण्यात आले आसुन रुग्णालयाचा अहवाल येताच त्यांचा जवाब नोंदवुन गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
तळीरामाला गावक-यांकडुन चोप..
माजी आ.प्रा संगीता ठोंबरे यांचेशी असभ्य बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक करणा-्या विजय गदळे या युवकाला,तो मद्यधुंद अवस्थेत आसताना गावक-यांनी चांगलाच चोप दिला आहे.