अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:19 IST2019-07-01T00:19:09+5:302019-07-01T00:19:38+5:30
शौचास गेलेल्या अल्पवयीन १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील शिरपुरा येथे दिनांक २७ जून रोजी घडली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
केज : शौचास गेलेल्या अल्पवयीन १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील शिरपुरा येथे दिनांक २७ जून रोजी घडली. या प्रकरणी एका परित्यक्ता महिलेसह एकाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरपुरा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक २७ जून रोजी रात्री आठच्या सुमारास शौचास गेली असता एका महिलेशी संगनमत करुन बाळू घुले (रा.टाकळी) याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन बाळू घुले व त्याला मदत करणाऱ्या महिलेच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक सिद्धे करत आहेत.