रिक्षाचालकाकडून अत्याचार; १४ व्या वर्षीच मुलगी बनली माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:35 IST2018-07-06T21:34:52+5:302018-07-06T21:35:01+5:30

कापूस वेचणीला जाताना लगट करुन एका १४ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली आणि अवघ्या १४ व्या वर्षीच तिने एका बाळाला जन्म दिला.

Atrocities by the autorickshaw driver; At the age of 14, daughter became mother | रिक्षाचालकाकडून अत्याचार; १४ व्या वर्षीच मुलगी बनली माता

रिक्षाचालकाकडून अत्याचार; १४ व्या वर्षीच मुलगी बनली माता

बीड : कापूस वेचणीला जाताना लगट करुन एका १४ वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली आणि अवघ्या १४ व्या वर्षीच तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या जबाबावरुन सुभाष महादेव जाधव (वय ३०, रा. कुर्ला) या रिक्षा चालकाविरोधात विविध कलामन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पीडिता ही बीड शहरातील रहिवासी आहे. ती सध्या आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने अधूनमधून ती मजुरीसाठी जात असे. आॅक्टोबर ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान ती बीड तालुक्यातील कुर्ला येथे कापूस वेचणीसाठी जात होती. बीडहून कुर्ला येथे नेण्यासाठी सुभाष जाधव याचा रिक्षा लावला होता. याच दरम्यान सुभाषने तिच्यासोबत लगट केली. तिला पे्रमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर तीन वेळेस अत्याचार केला. यातूनच ती गर्भवती राहिली. १८ एप्रिल रोजी पीडितेच्या आईला संशय आल्याने तिने तिची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. मात्र, गर्भपात करण्याचा कालावधी निघून गेल्याने काहीच करता आले नसल्याचे सूत्रांकडून समजते. दोन दिवसांपूर्वी या १४ वर्षीय मुलीने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर हा प्रकार चव्हाट्यावर आला. जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिला. याप्रकरणी सुभाष जाधव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अर्ध्या तासात आरोपी जेरबंद
गुन्हा दाखल होताच बीड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस हवालदार भागवत शेलार, रमेश दुबाले यांनी कुर्ला येथे जावून सापळा रचत आरोपी सुभाष जाधव यास बेड्या ठोकल्या.

Web Title: Atrocities by the autorickshaw driver; At the age of 14, daughter became mother