अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकानेच केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:58 IST2018-11-12T23:58:24+5:302018-11-12T23:58:55+5:30
तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.

अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकानेच केला अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातील एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.
नांदगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधून तिच्या नात्यातील शशिकांत बाळासाहेब चव्हाण (वय ४०) याने भावकीतील एकाच्या शेतात नेऊन तिच्यावर तीन वेळेस अत्याचार केला आणि याबाबत कुठे वाच्यता केलीस तर तुला जीवे मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेने बर्दापूर पोलीस ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. याप्रकरणी शशिकांत चव्हाण याच्यावर कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत शशिकांतला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक केंद्रे हे करत आहेत.