शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

मतदानादिवशी मारहाण; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:22 IST

अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Beed Kailas Phad: काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कैलास फड याच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाच्या दिवशी कैलास फड याने परळीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना मारहाण केली होती. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. मात्र अद्याप फड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. आता अखेर पोलिसांनी कैलास फडला दणका देत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

विधानसभा निवडणुकीदरम्यान परळी मतदारसंघात अनेक वादाच्या घटना घडल्या होत्या. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून अनेक गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता. त्यातच मतदानादिवशी माधव जाधव यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला. याप्रकरणी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला असून त्यानुसार कैलास फडविरोधात परळी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हवेत फायरिंग केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल

मागील वर्षी दिवाळी दरम्यान परळीच्या  बँक कॉलनीतील घराजवळ वाहन पूजा करत असताना एका तरुणाने रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी कैलास फड याच्यावर काही दिवसांपूर्वी परळी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसंच त्याला अटकही केली होती. परळी  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विष्णू फड यांनी २३ डिसेंबर रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  होती. 

टॅग्स :Beed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडे