घरफोडी प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 14:46 IST2021-09-03T14:46:16+5:302021-09-03T14:46:39+5:30

खबऱ्यामार्फत माहितीवरून आष्टी पोलिसांनी केली कारवाई

Ashti police arrested the accused in the burglary case | घरफोडी प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

घरफोडी प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कडा ( बीड ) : लिंबोडी येथील एका वस्तीवर  22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री घरफोडी करून 70 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणात आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने कडा परिसरातून गुरूवारी रात्री संतोष उर्फ बलमा जायभाय ( रा. कडा ) या चोरट्यास जेरबंद केले.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील गर्जे वस्तीवर  22 ऑगस्टच्या मध्यरात्री रोजी चोरी झाली होती. नवनाथ गर्जे यांच्या घरात घुसून चोरट्याने सोने, रोख रक्कम, दोन मोबाईल असा 70 हजारांचा ऐवज लंपास केला होता. यानंतर नवनाथ गर्जे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, गुरूवारी एका गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना चोरट्याबद्दल माहिती मिळाली. यावरून आरोपी संतोष उर्फ बलमा जायभाय यास कडा परिसरातून रात्री ७ वाजेच्या सुमारास आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. ही कारवाई उपअधीक्षक विजय लगारे, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, बाबासाहेब राख, पोलिस शिपाई मंगेश मिसाळ, बंडु दुधाळ यांनी केली. आरोपीच्या चौकशीतून परिसरातील इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Ashti police arrested the accused in the burglary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.