राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 07:29 PM2019-11-28T19:29:22+5:302019-11-28T19:30:41+5:30

टोकवाडी येथील एका लग्न सोहळा आटोपून गावाकडे परताना अपघात

The ash tipper, who transported the ashes, crushed the two-wheeler In Parali | राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले

राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले

Next

परळी:  येथील थर्मल रोडवर चेंमरी रेस्ट हाऊस समोर गुरुवारी दुपारी एका टिप्परची व मोटरसायकलची धडक झाल्याची घटना घडली असून यात मोटरसायकलस्वार शिवराज सत्यपाल गित्ते (38, रा नंदागोळ ता परळी ) यांचा जागीच मृत्यू झाला. टोकवाडी येथील एका लग्न सोहळ्यात उपस्थित राहून  परळीमार्गे  मोटरसायकलवरून गावाकडे परत येत असताना गित्ते यांच्या दुचाकीस अपघात झाला. 

गीते यांच्या मृतदेहाची परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली व अंत्यसंस्कारासाठी नंदागोळ येथे नेण्यात आले . घटनास्थळास परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रया ऐटवार, जमादार व्यंकट भताने  इतर पोलिस कर्मचार्‍यांनी भेट दिली याप्रकरणी पोलिसांनी  टिप्पर ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

परळी शहरात राखेच्या टिप्परची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे .शहरात धुळीच्या कणांनी प्रदूषण होत असून धुळीचे कण मोटरसायकल स्वारांच्या डोळ्यात जात आहे व राखेचे टिप्पर  नियमांची पायमल्ली करून चालवले जात आहे . भरधाव वेगाने राखेचे  वाहने चालवण्यात येत असल्याने संपूर्ण तालुका हैराण झाला आहे .याकडे आर टी ओ  अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे शहरातील थर्मल रोडवरील चेंमरी रेस्ट हाऊस  समोर बंद टिप्पर, ट्रक ही  वाहने लावण्यात आली असून ते ही अपघातास कारणीभूत  ठरत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यावरच नादुरुस्त वाहने उभा केली असतानाही संबंधित विभाग एक कडे डोळे झाक करीत आहेत अशी स्थिती शहरातील वैद्यनाथ महाविद्यालय वळणावर आहे .टिप्पर मालकाने   या रस्त्यावर व फुटपाथवर आपले नादुरुस्त वाहने लावली आहेत. तसेच परळी -गंगाखेड रस्ताही राखेच्या ट्रक मुळे मौत का कुवा बनला आहे.

Web Title: The ash tipper, who transported the ashes, crushed the two-wheeler In Parali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.