करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण; उद्या होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 16:30 IST2021-09-20T16:28:33+5:302021-09-20T16:30:24+5:30
karuna Sharma : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण; उद्या होणार निर्णय
अंबाजोगाई : जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम अजुन एक दिवसाने वाढला असून मंगळवारी जमीन अर्जावर निकाल देण्यात येणार आहे. आज (दि.२०) रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यालायासमोर झाला. यामुळे त्यावर निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र न्यायालय मंगळवारी जामीन अर्जावर निकाल देणार असल्याचे शर्मा यांचे वकील जयंत भारजकर यांनी सांगितले.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. शनिवारी न्या.सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने ॲड. भारजकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले होते. आज सोमवारी ही न्यायालयाचे कामकाज झाले. मात्र यावरची अंतिम सुनावणी व जामीन अर्जावरील निर्णय आता मंगळवारी होणार असल्याने करुणा शर्मा यांचा कोठडीतील मुक्काम एक दिवसाने वाढला आहे.
हेही वाचा -
- विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरण; विद्यापीठाचे पीआरओ संजय शिंदे निलंबित
- हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू