शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST

रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी गेवराई : तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे ...

रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

गेवराई : तालुक्यातील जातेगाव ते गेवराई या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कडबा दोन हजार रुपये शेकडा

बीड : पशुधनाच्या चाऱ्यासाठी रब्बी हंगामात निघालेल्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव आला असून, पशुधन जगविण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने कडब्याची खरेदी करून साठवण करीत आहेत. त्यामुळे ज्वारीच्या कडब्याचे भाव आतापासूनच वाढत चालले आहेत. ज्वारीच्या शंभर पेंढ्यांना दोन हजारांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे.

सुजाण नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे

बीड : राज्यात कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम थेट रक्ताच्या साठ्यावर झाला असून, केवळ पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. सुजाण नागरिकांनी तसेच रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी अधिकाधिक कार्य करून रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.

फळांना मागणी वाढली

अंबाजोगाई : शहरातील बाजारपेठेत मागील आठवडाभरापासून फळांची आवक वाढली आहे. सध्या बाजारात द्राक्षे, पपई, अननस, टरबूज, खरबूज, सफरचंद, संत्री, मोसंबी, केळी, चिकू, नारळपाणी या फळांची आवक वाढली आहे. द्राक्षे ५० रुपये, तर खरबूज ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. उष्णतेपासून थंडावा मिळावा म्हणून फळांची मागणी वाढली असल्याचे फळविक्रेते खलील मौलाना यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीकडून मार्गदर्शन

अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोना संसर्गापासून बचाव कसा करायचा? काय काळजी घ्यायची? कोरोनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. याबाबत गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सांगितल्या जात आहेत.

गाजर गवताच्या वेढ्याने अस्वच्छता

अंबाजोगाई : शहरातील शासकीय कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वच्छतेकडे अद्यापही दुर्लक्ष केले जात आहे. ही स्वच्छतेची समस्या मार्गी लावली जात नाही. स्वच्छता करून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

प्लॅस्टिकबंदी केवळ कागदावरच

बीड : प्लॅस्टिक वापरावर बंदी असतानाही अंबाजोगाई शहर व परिसरात अजूनही सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. व्यावसायिकांकडून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये विविध वस्तू दिल्या जातात. भाजी मार्केटमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नगरपरिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.