पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने वृध्दाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 15:03 IST2023-05-04T15:02:39+5:302023-05-04T15:03:00+5:30
आष्टी तालुक्यातील बावी येथील घटना

पाणी शेंदताना पाय घसरून विहिरीत पडल्याने वृध्दाचा मृत्यू
- नितीन कांबळे
कडा (बीड) : पाणी आणण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली. कारभारी रामराव सोनवणे (६८) असे मृताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील बावी येथील कारभारी रामराव सोनवणे हे गुरूवारी पहाटे घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. पाणी शेंदताना अचानक पाय घसल्याने ते विहीरीत पडले. बराच वेळ काराभारी सोनवणे घरी लवकर न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार विकास राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.