शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईची नवी ओळख 'पुस्तकांचं गाव'; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:17 IST

राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने 'पुस्तकांचं गाव' योजना राबविण्यात येते.

अंबाजोगाई : उच्च तंत्र शिक्षण, उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज अंबाजोगाई शहरास 'पुस्तकांचं गाव' म्हणून घोषित केले. अंबाजोगाई राज्यातील "पाचवे" पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाईल. यामुळे शहराच्या मराठी साहित्य निर्मिती परंपरेचा एकप्रकारे गौरवच झाला आहे.

राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने 'पुस्तकांचं गाव' योजना राबविण्यात येते. महाराष्ट्र शासनाच्यावतीने  २०१७ साली तत्कालीन सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून 'पुस्तकांचं गाव' हा उपक्रम सुरू करण्यात आला. या संकल्पनेतून ४ मे २०१७ साली सातारा जिल्ह्यातील "भिलार" हे गाव  'पुस्तकांचं गाव'  म्हणून घोषित करण्यात आले आणि याच दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री मा.ना.विनोद तावडे यांनी एका वाचनालयाची सुरुवात भिलार या गावात करण्यात आली. या भिलार गावातील प्रत्येक घरात एक छोटी लायब्ररी आहे. जिथे विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. येथे प्रत्येक घरात वाचनासाठी प्रवेश खुले आहेत. त्यामुळे नागरीक आणि पर्यटक या घरांमध्ये जावून पुस्तके वाचू शकतात. या गावात २५ घरांमध्ये १५ हजारहून अधिक पुस्तकांसह तेंव्हा हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. याच धर्तीवर आता अंबाजोगाईमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

दरम्यान, आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी अंबाजोगाई शहराचा 'पुस्तकांचं गाव' या उपक्रमात समावेश केल्याची घोषणा केली.  'पुस्तकांचं गाव' म्हणून घोषित करण्यात आलेल्या गावांमध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करण्यात यावीत. या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. तसेच त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध असावीत, शिवाय येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत. या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेस दिले.

शहराला मराठी साहित्यिकांची परंपराअंबाजोगाई शहरात पुरातन काळापासून साहित्याचा निवास आहे. मराठीचे आद्यकवी स्वामी मुकुंदराज स्वामी, पासोडीकार संत दासोपंत यांच्या पासून सुरु झालेली साहित्य सेवा आज ही अव्याहतपणे सुरूच आहे. त्यामुळे या शहराचा  'पुस्तकांचं गाव' या योजनेत केलेला समावेश हा शहरातील साहित्य सेवेचा गौरवच आहे.

राजकिशोर मोदींच्या पाठपुराव्याला यशअंबाजोगाई शहरास 'पुस्तकांचं गाव' म्हणून जाहीर करावे. याकरिता माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांनी वैयक्तिकरित्या मंत्री उदय सामंत यांच्याकडे व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे जुलै २०२४ मध्येही पत्राद्वारे मागणी केली होती. मोदी यांच्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले.

टॅग्स :marathiमराठीUday Samantउदय सामंतBeedबीड