अंमळनेरच्या पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारला अपघात; बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:50 IST2020-06-15T16:49:30+5:302020-06-15T16:50:50+5:30
जायकवाडीजवळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उभ्या बैलगाडीला त्यांची कार धडकली.

अंमळनेरच्या पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कारला अपघात; बालंबाल बचावले
बीड : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या कारला अपघात झाला. यात सुदैवाने दोघांनाही कसलीच जखम झाली नाही. हा अपघात सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अंमळनेर - डोंगरकिन्ही मार्गावरील जायकवाडीजवळ घडला.
अंमळनेर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर बडे हे दोघे कामानिमित्त डोंगरकिन्ही येथे खाजगी वाहनातून गेले होते. काम आटोपून पहाटेच्या सुमारास परत जात असताना जायकवाडीजवळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उभ्या बैलगाडीला त्यांची कार धडकली. सुदैवाने यात त्यांना कसलीही जखम झाली नाही. वेळीच कारवर नियंत्रण मिळविल्याने दोघेही बालंबाल बचावले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना आरोग्य केंद्रात दाखल केले. आपण दोघेही सुखरूप असल्याचे डॉ.बडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.