शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:32 IST

जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपालिकांमध्ये भाजप-राष्ट्रवादी थेट आमने-सामने

- सोमनाथ खताळ

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा राजकीय पेचप्रसंग समोर आला आहे. राज्यात महायुतीचे घटक पक्ष असूनही जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी तब्बल पाच ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थेट त्यांच्याच युतीतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपचे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे ही स्थानिक निवडणूक अत्यंत रंजक आणि निर्णायक बनली आहे.

अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. महायुतीमधील स्थानिक नेत्यांनी जागावाटपावर एकमत न केल्यामुळे बीड, माजलगाव, धारूर, गेवराई आणि अंबाजोगाई या पाच महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी थेट लढत होत आहे. युतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकीकडे वरिष्ठ पातळीवर 'महायुती'चा नारा दिला जात असताना, स्थानिक स्तरावर मात्र दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी जोर लावत आहेत. हा संघर्ष म्हणजे स्थानिक नेतृत्वाचा अहंकार आणि राजकीय वर्चस्वासाठीची लढाई असल्याचे स्पष्ट होते.

परळी वगळता सर्वत्र संघर्षजिल्ह्यात फक्त परळी नगरपालिकेतच महायुतीचे चित्र दिसले. परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत आघाडी केली आहे. मात्र, उर्वरित पाच ठिकाणी युतीचा धर्म पाळला गेला नाही, ज्यामुळे दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेही या विचित्र परिस्थितीवर भाष्य करणे टाळत आहेत.

राजकीय परिणाम काय होणार?बीड जिल्ह्यातील या स्थानिक संघर्षाचा परिणाम अजित पवार यांच्या पालकमंत्री पदावरील पकडीवर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले नाही, तर भाजपला पालकमंत्री असूनही त्यांच्या पक्षाला बीडमध्ये आव्हान देण्यास यश आले, असा संदेश जनतेत जाईल. या थेट लढतीमुळे महायुतीच्या भविष्यातील स्थानिक राजकारणातील जागावाटपावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे बीडमध्ये आव्हानजिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीच अशी थेट लढत होत आहे. परंतु, बीड शहरात या दोन्ही पक्षांना महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे. यातही अंतर्गत वादावादीचा फटका आघाडीला बसण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडीचे हवे तेवढे बळ दिसत नाही; परंतु निकालानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's party faces BJP challenge in Beed local elections.

Web Summary : Despite being allies, Ajit Pawar's NCP faces a direct challenge from BJP in five Beed municipalities. This rivalry jeopardizes Pawar's political standing and raises questions about future alliances. Mahavikas Aghadi also presents a challenge in Beed city.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकBeedबीडAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा