शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडेंपासून अजितदादांपर्यंत; दिग्गजांच्या 'अखेरच्या क्षणांचे' विधिकर्ता शास्त्री गुरुजी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:40 IST

Ajit Pawar Death: दगडूशेठ मंदिरातली पूजा ते अनेक राजकीय घराण्यांचे 'गुरुजी'

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : माजलगावच्या मातीतील एक तरुण, जो घरच्या गरिबीमुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे एकेकाळी घर सोडून पळाला होता, तो आज देशातील बड्या राजकीय घराण्यांचा ‘श्रद्धास्थान’ बनला आहे. गजानन शास्त्री गुंजकर असे या व्यक्तिमत्त्वाचे नाव. गुरुवारी महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी पार पडले आणि हे विधी पूर्ण करण्याची जबाबदारी गजानन शास्त्रींनीच निभावली.

गजानन शास्त्रींची पुण्याला जाऊन वेद-विद्येचे शिक्षण घेण्याची त्यांची ओढ होती; पण घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा विरोध होता. अखेर एका जिद्दीपोटी ते घर सोडून पुण्याला गेले. तिथे सुरुवातीची तीन वर्षे दगडूशेठ गणपती मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा-अर्चा केली. याच काळात त्यांची भेट धनंजय मुंडे यांच्याशी झाली. मुंडेंनी अनेक नेत्यांशी त्यांची ओळख करून दिली. माजलगावच्या एका सामान्य कुटुंबातून निघालेला हा प्रवास आज राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार बनला आहे.

पवार घराण्याचे ‘फॅमिली गुरुजी’गेल्या आठ वर्षांपासून अजित पवार यांच्याशी गजानन शास्त्रींचा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता. पवारांच्या घरातील प्रत्येक देवकार्य, शुभमंगल कार्य हे शास्त्रींच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नसे. ते केवळ गुरुजीच राहिले नाहीत, तर पवार घराण्याचे ‘फॅमिली गुरुजी’ बनले. अगदी दोन महिन्यांपूर्वी अजितदादांचे पुत्र जय पवार यांचा विवाह सोहळा बहरीनसारख्या देशात पार पडला, तिथेही सर्व विधी गजानन शास्त्रींनीच पूर्ण केले होते.

दिग्गजांचा अखेरचा निरोपशास्त्री यांनी यापूर्वी देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली, लोकनेते गोपीनाथराव मुंडे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र पोरकाअजितदादा हे स्पष्टवक्ते, शब्दाला जागणारे आणि हजरजबाबी नेते होते. त्यांचे कुटुंब अतिशय सुसंस्कृत आहे. त्यांच्या जाण्याने केवळ वैयक्तिक नुकसान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.- गजानन शास्त्री गुंजकर

English
हिंदी सारांश
Web Title : Gopinath Munde to Ajit Pawar: Who is the dignified Guru?

Web Summary : Gajanan Shastri, from humble beginnings, became a respected figure for political families. He conducted Ajit Pawar's last rites, having previously performed final rituals for prominent leaders like Gopinath Munde and Arun Jaitley. He was considered the Pawar family's guru.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीड