शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीडचे 'पालक' हरपले! अजित पवारांच्या निधनाने विकासाचा झंझावात शांत; २२ कोटींच्या निधीची ती शेवटची भेट ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:45 IST

Ajit Pawar Death: प्रशासकीय शिस्तीचा 'दादा पॅटर्न' संपला! बीडच्या प्रगतीसाठी झटणारा एक कार्यसम्राट नेता हरपला

बीड: बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे, प्रशासकीय कामात शिस्त आणणारे आणि जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता धडकताच संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात 'दादां'चा अंत झाला आणि बीडच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा अध्याय अपूर्ण राहिला.

शेवटच्या श्वासापर्यंत जिल्ह्याचा ध्यास अजितदादांनी बीडचे पालकत्व स्वीकारल्यापासून जिल्ह्यासाठी निधीचा ओघ कधीच कमी पडू दिला नाही. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी बीड शहरातील २४ विविध विकासकामांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तो निधी जणू त्यांनी बीडकरांना दिलेली शेवटची भेट ठरली. अहिल्यानगर ते परळी या प्रलंबित रेल्वे मार्गासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि बीडला विमानतळ मिळवून देण्यासाठीचा त्यांचा पाठपुरावा जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड मानला जातो.

बीडकरांशी होते भावनिक नाते केवळ रस्ते आणि इमारतीच नव्हे, तर 'ट्रिपलआयटी' सारख्या प्रकल्पातून बीडच्या तरुणांना रोजगार मिळावा, हा त्यांचा ध्यास होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५७५ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करून त्यांनी जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे प्रशासकीय वर्तुळात 'दादा पॅटर्न'ची मोठी दहशत आणि आदर होता. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक राजकारणी नाही, तर बीडच्या प्रगतीचा खरा शिल्पकार हरपला आहे. जिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीड