आष्टीसह तालुक्यात अहिल्याबाई होळकर जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:47+5:302021-06-04T04:25:47+5:30
आष्टी : शहरातील चौकात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त माजी आ. भीमराव धोंडे यांनी प्रतिमेचे ...

आष्टीसह तालुक्यात अहिल्याबाई होळकर जयंती
आष्टी : शहरातील चौकात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त माजी आ. भीमराव धोंडे यांनी प्रतिमेचे पूजन केले. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ज्या चौंडी गावात झाला ते पूर्वी आष्टी तालुक्यात होते. बीड जिल्ह्यातून परराज्यात जाऊन इंदौर या ठिकाणी उत्कृष्ट राज्यकारभार करून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली. अहिल्याबाई होळकर यांनी स्वतः घोडेसवारी करून अनेक महिलांना प्रेरित करून सक्षम केले, असे मनोगत माजी आ. धोंडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बीड जि. प.चे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, अमोल तरटे, अशोक ढवण, नाजिम शेख, हनुमंत भिसे, अरुण सायकड, संतोष दाणी, राजेंद्र लाड, राजू गोल्हार, सुनील पारखे, संदीप अस्वर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील पिंपळा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष युवराज खटके, प्रा. दादासाहेब विधाते, बाळासाहेब दिंडे, संजय दहागुडे, रामदास शेंडगे, सोन्याबापू भवर, चंद्रकांत शेंडगे, अजिनाथ दिंडे, धनराज खटके आदी उपस्थित होते, तसेच कडा, धामणगाव, धानोरा, दौलावडगावसह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी घराघरांत राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी केली.
===Photopath===
310521\13042850img-20210531-wa0509_14.jpg