बंजारा परिषदेचा एक तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:49 IST2019-01-28T00:49:10+5:302019-01-28T00:49:25+5:30

वडवणी तालुक्यातील स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Agitation by the Banjara organisation | बंजारा परिषदेचा एक तास रास्ता रोको

बंजारा परिषदेचा एक तास रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : वडवणी तालुक्यातील स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
स्वातीच्या मृत्यूला जबाबदार सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी २७ जानेवारी रोजी तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन राठोड व जिल्हा परिषद सदस्य शरद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको झाला.
या आंदोलनात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, तालुका अध्यक्ष आबासाहेब राठोड, लालखेडचे उपसरपंच विनायक चव्हाण, विजय राठोड, आबासाहेब राठोड, मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, पाझर देशमुख, गोर सेनेचे तालुका अध्यक्ष रमेश चव्हाण, लहू पवार, पवन राठोड, अतुल राठोड, राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, अविनाश राठोड, कृष्णा पवारसह बंजारा समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: Agitation by the Banjara organisation