शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुन्हा 'एक मराठा,लाख मराठा'; अंबाजोगाईत मराठा समाजाचा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 5:54 PM

Maratha Reservation यावेळी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन दोन्ही आमदारांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देमराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश कराआरक्षण स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती थांबवा

अंबाजोगाई : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१६) सकाळी अंबाजोगाईत सकल मराठा समाजाच्या वतीने येथील दोन्ही आमदारांच्या निवासस्थानावर क्रांती मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन दोन्ही आमदारांना निवेदन देण्यात आले.  सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाचा मराठा समाजाला मोठा धक्का बसला असून त्याविरोधात प्रचंड क्षोभ आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अंबाजोगाईत सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुकवारी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा सर्वप्रथम आ. संजय दौंड यांच्या घरावर धडकला. आ. दौंड यांना निवेदन दिल्यानंतर बसस्थानक, छत्रपती शिवाजी चौक मार्गे आ. नमिता मुंदडा यांच्या निवास्थानी दाखल होत मोर्चेकऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. 

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळातही मराठा समाजातील हजारो बांधवांनी उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभाग नोंदविला. विशेषतः महिलांच्या संख्या लक्षणीय होती. ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे, डोक्‍यावर भगवी टोपी, गळ्यात भगवे उपरणे अशा वेशातील आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणेसह आरक्षण मागणीच्या घोषणांनी शहर दणाणून सोडले. या मोर्चाने तीन वर्षापूर्वी राज्यभरात निघालेल्या लाखोंच्या संख्येच्या मराठा मोर्चाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

तगडा पोलीस बंदोबस्तमोर्चाला होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. एक सहा.पोलीस निरिक्षक, ९ पोलीस निरिक्षक आणि ६५ पोलीस कर्मचाऱ्यांसह स्वतः पीआय सिद्धार्थ गाडे हे पूर्णवेळ बंदोबस्तावर हजर होते. तर, पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी सुनील जायभाये हे सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कुठल्याही अनुचित घटनेविना मोर्चा शांततेत पार पडला. या आहेत मागण्या :दोन्ही आमदारांना मोर्चात सामील लहान मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, त्यासाठी स्वतंत्र गट करून ओबीसीचे टक्केवारी वाढवावी, स्थगिती उठेपर्यंत शासकीय नोकरभरती करू नये, स्थगिती उठविण्यासाठी सरकारने तत्काळ प्रयत्न करावेत, २०१४ च्या मेगा नोकर भरतीत आरक्षण कोट्यातून पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, ‘एमपीएससी’च्या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, स्थगितीपूर्वी सुरु असलेली शैक्षणिक प्रक्रिया पूर्वलक्षी प्रभावाने चालू ठेवावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करून कर्जप्रक्रिया सुलभ करावी, सारथी संस्थेला तत्काळ निधी देऊन सारथी संस्था बळकट करावी अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. 

 राज्यभर निघालेल्या मराठा मोर्चांनी इतिहास घडवत आरक्षण मिळविले. परंतु, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची देखील आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी आगामी अधिवेशनात लावून धरणार.- आ. संजय दौंड, विधान परिषद सदस्य

 माझ्यासह भाजप पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे. येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा केवळ मुद्दा मांडून शांत बसणार नाही तर त्याचा आम्ही सर्वजण पाठपुरावा करू. या मुद्द्यावर मी मराठा आंदोलकांसोबत असून वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरण्यास देखील तयार आहे.- आ. नमिता मुंदडा, केज विधानसभा सदस्य 

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड