शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात परजिल्ह्यातील मजूर दाखल; सालगड्याचे वेतन सव्वा लाखाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

अचानकच सालगड्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यात सालगडी हे गावातीलच असतात. मात्र, ...

अचानकच सालगड्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट निर्माण झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यात सालगडी हे गावातीलच असतात. मात्र, आता परजिल्ह्यातून व आदिवासी भागातून मजूर मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. परिसरातील गावांमध्ये बहुतांश सालगडी परजिल्ह्यातील आहेत, तर काही ठिकाणी पंधरा ते वीस वर्षांपासून येथेच अनेक लोक वास्तव्यास आलेले आहेत. ते तालुक्याचे रहिवासी झाले आहेत. गावातून सालगडी मोजकेच मिळतात. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या सालगड्यांना शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत.

तालुक्यात ग्रीन बेल्ट असणाऱ्या भागामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उसाला पाणी देण्यासाठी मजुरांची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय हा भाग सुपीक व सधन असल्याने इथे सालगड्यांना सव्वा लाखाच्या घरात वार्षिक मोबदला दिला जातो. त्या तुलनेत डोंगराळ भागात शेतकऱ्यांना उत्पादन मर्यादित होते, शिवाय डोंगराळ भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणात विविध साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी जातात. त्यामुळे डोंगराळ भागात शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नाही. जे मजूर मिळतात त्यांच्यासाठी मोठा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा लागतो.

शेतीमधील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत बेताचीच राहते. अशा स्थितीत गडी न ठेवता स्वत:च शेती कसण्याकडे अनेकांचा भर आहे.

उचल म्हणून ५० टक्के रक्कम

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर बोलणी झाल्यानंतर तातडीने संबंधित सालगड्याला उचल म्हणून ठरलेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम द्यावी लागते. शिवाय शेतात कुटुंबासह राहण्याची सोय करावी लागते. सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने मिळेत त्या सालगड्याला मोबदला देऊन गुंतवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.