शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पाणीउपसा रोखण्यासाठी प्रशासनाची आडमुठी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:11 IST

काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच सर्व तलाव, गोदावरी नदी व इतर पाणी पुवठा करणाऱ्या ठिकाणावरुन पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना असताना पाटबंधारे विभागाकडून महावितरणच्या मदतीने विद्यूत पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना वेळोवेळी वीज खंडित होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.गोदापट्टा किंवा जलसाठवण तलाव तसेच इतर मोठ्या प्रकल्पातून पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही ठिकाणी मोटारी टाकून ऊस व इतर बागायती पिकांना पाणी दिले जात आहे. त्यांच्या मोटारी जप्त करुन कारवाई करण्याऐवजी महावितरणकडून विद्यूत पुरवठा खंडित करुन पाणी उपसा रोखण्याचा फसवा प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केला जात आहे. मात्र, याचा फटका सामान्य शेतक-यांना बसत असल्याचे गेवराई, माजलगाव, धारुर व इतर गोदाकाठावरील शेतक-यांकडून सांगण्यात आले. या परिसरात अनेक शेतक-यांच्या वहिरींना व बोअरला थोडेफार पाणी शिल्लक आहे. या पाण्यावर शेतकरी आपल्या जनावरांना पाणी पाजतात, तसेच दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पाणी वापरले जाते. परंतु विद्यूत पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उपसा करता येत नाही.गेवराई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले जाते. हे पाणी गोदापात्रातून शहागड बंधाºयात येते. मात्र, या पाण्याचा शेतकरी उपसा करतात अशी भूमिका घेत नगरपालिकेने पाटबंधारे विभाग आणि महावितरण यांच्यावर दबाव वाढविला आहे. पाण्याचा विनापरवाना उपसा होत असेल तर अशा मोटारी जप्त करणे अथवा कारवाई अपेक्षित आहे. संबंधित कार्यालयांकडून महावितरणला हाताशी धरून या परिसरातील वीजपुरवठाच खंडित ठेवण्याची नवी शक्कल लढवली जात आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतक-यांना बसत आहे. तात्काळ हा वीजपुरवठा खंडित करण्याचा खेळ थांबवा अन्यथा सर्व संबंधित कार्यालयांवर आंदोलन केले जाईल, असा इशारा देखील गोदाकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.मागील ५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडितगोदाकाठच्या गावांचा वीज पुरवठा मागच्या ४ ते ५ दिवसांपासून सातत्याने बंद करण्यात येत आहे.ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिका-यांना विचारल्यास ‘आम्हाला पाटबंधारे विभागाने पत्र दिले आहे’ असे सांगून अधिकारी मोकळे होतात.वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतक-यांना स्वत:च्या विहिरीतून पाणी काढून जनावरांना पाणी कसे पाजायचे हा प्रश्न पडला आहे.गावात टँकरला दूषित पाणी येते. मग घरी माणसांना पिण्यासाठी पाणी कोठून न्यायचे असे अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प