कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST2021-02-25T04:41:16+5:302021-02-25T04:41:16+5:30
धारूर : धारूर शहरामध्ये मंगळवारी तहसील नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे वतीने मुख्य रस्त्याने पथसंचलन काढून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती ...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे पथसंचलन
धारूर : धारूर शहरामध्ये मंगळवारी तहसील नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे वतीने मुख्य रस्त्याने पथसंचलन काढून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करून नियमाचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
धारूर शहरात तहसील कार्यालय नगरपालिका व पोलीस स्टेशनच्या वतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली.
शहरात मुख्य रस्त्याने पथसंचलन करून जनजागृती केली. प्रशासनाने दिलेले नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नागरिकांना मास्क वापरण्यासाठी व सोशल डिस्टन्स ठेवून आपले व्यवहार करण्यासाठी आवाहन करण्यात आली. कोरोनाविषयी नागरिकांना काही लक्षणे असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य रस्त्याने नागरिकांना आवाहन, जनजागृती करत हे पथसंचलन काढण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी नितीन विजाते, सचिन डावकर, अरुण वाघमारे तर पोलीस स्टेशनचे सत्यप्रेम मिसाळ आकाश राऊत आदी कर्मचारी उपस्थित होते.