शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिरात उदयापासून अधिक मास उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 17:05 IST

महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत देशभरातील लाखो भाविक दर्शनाला येणार असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव: तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीकाठी तेराव्या शतकातील हेमाडपंती बांधकाम असलेले भगवान विष्णूचा अवतार  पुरुषोत्तमाचे देशातील एकमेव मंदिर आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात ( धोंड्याचा महिना ) पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे महात्म्य असल्याने या गावास वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या अधिक मासास मंगळवारी प्रारंभ होत आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापुजेने उत्सवास प्रारंभ होईल. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत देशभरातील लाखो भाविक दर्शनाला येणार असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सुरु आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीकाठी पुरुषोत्तमपुरी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे गोदावरीकाठापासून अलीकडे शंभर मीटर अंतरावर तेराव्या शतकात राजा रामदेवराय यांच्या काळात विष्णूचा अवतार - भगवान पुरुषोत्तमाचे हेमाडपंती मंदिर दगड -विटांनी बांधलेले आहे. या बांधकामातील विटा पाण्यावर तरंगतात हे आश्चर्य आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील गाभाऱ्यात गंडकी शिळेची  भगवान पुरुषोत्तमाची उभी मूर्ती, हाती शंख-चक्र-गदा-पद्म धारण केलेली तीन फूट उंचीची आहे. 

पुरातन काळात या परिसरात दंडकारण्य होते. तेथे शार्दूल नावाचा राक्षस रयतेला त्रास देत असे. भगवान विष्णूने पुरुषोत्तमाचा अवतार धारण करून आपल्या हातातील चक्राने राक्षसाचा वध केला व ते चक्र गोदावरी नदीत धुऊन काढल्याने या तीर्थाला चक्रतीर्थ असे नाव पडले. आजही मंदिरापासून समोरच गोदावरी नदी व चक्रतीर्थाचे सुंदर व विलोभनीय अशा दृश्याचे दर्शन होते. 

'धोंडे महात्म्य ' या पवित्र ग्रंथात उल्लेखलेल्या बारा महिन्यांना बारा भगवंत स्वामी आहेत. मात्र सर्वांचा मिळून बनलेल्या अधिक मासाचे स्वामित्व कोणीच स्वीकारत नसल्याने ते पुरुषोत्तमाने स्वीकारले. त्यामुळे दर तीन वर्षांनी येणारा अधिक मासात ( धोंड्याचा महिना ) पुरुषोत्तम दर्शनास महत्त्व आहे.  या मंदिराच्या बाजूसच महादेवाचे मंदिर आहे. येथे वरद विनायक गणपतीची चार फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका व महादेवाची पिंड असा त्रिवेणी संगम आहे. आता ही दोन्ही ही मंदिरे जीर्णोद्धारासाठी पाडलेली असून या मूर्तीचे पत्र्याच्या शेडमध्ये दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकमासामध्ये संपूर्ण महिनाभर देशातील विविध भागातून ५ ते ६ लाख भाविक गर्दी करतात. परिवहन मंडळाच्या बस, ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनांनी भाविक येतात. दर्शनासाठी पावसाचा त्रास होऊ नये म्हणून ९० बाय ७० आकाराचे दिड हजार भाविक थांबू शकतील असे शेड उभारण्यात आले आहे. तुळजाभवानी मल्टिस्टेटच्या वतीने चेअरमन चंद्रकांत शेजुळ यांनी पिण्याचे दररोज एक हजार जारची व्यवस्था मोफत केली आहे.

धोंडे अर्पण करण्याची आहे परंपराभारतीय सांस्कृतित धोंड्याच्या महीन्याला अनन्यसाधारण महत्व असून या महिन्यात सौभाग्यवती स्त्रिया गोदावरीत स्नान करुन पतीच्या दिर्घआयुष्यासाठी पुरुषोत्तमाला ३३ असे धोंडे अर्पण करतात. त्यात अनेक जण कुवतीप्रमाणे एक सोन्याचा, चांदीचा तर बाकी पुरणाचे धोंडे वाहतात.

निझाम राजवटीत होते मानाचे स्थाननिझाम राजवटीत या स्थानाला फार मोठा मान होता. या संस्थानला शेकडो एकर जमिनी, मालमत्ता तात्कालीन राजवटीने प्रधान केल्या होत्या. माञ अनेक मालमत्ता वहीतीदाराने बळकवल्याचे सांगितले जाते. मंदीरासंबंधी तीन ताम्रपट उस्मानिया विद्यापीठ हैद्राबाद येथे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे त्याचे भाषांतर, प्रकाशन, रेकाँर्डींग केले असून त्यात या पौराणिक स्थळाचे महत्व विशद करण्यात आले आहे.  

रस्त्याकडे राज्यकर्त्याचे दुर्लक्ष !तालुक्याला एवढा मोठा पुरातन वारसा असतांना येथील राज्यकर्त्यांना येथील रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नसून दरवर्षी त्यांना अधिक मासातच भगवान पुरुषोत्तमाची आठवण येते.अरुंद व उखडलेल्या रस्त्यामुळे येणाऱ्या भाविकांना वाहतुक कोंडीचा व गैरसोयीचा सामना करावा लागु शकतो.

जीर्णोद्धाराचे काम युद्धपातळीवरया पुरातन मंदिराचा ठेवा जतन करण्यासाठी  व त्यास संवर्धनासाठी मदत मिळण्यासाठी माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली. त्यांनी या गोदकाठच्या सुंदर अशा मंदिरास ५४.५६ कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर या कामाने वेग घेतला असून आता मंदिराचे पुरातन रूप जतन करून आहे. तसेच मंदिर नवीन रुपात बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ६.८५ कोटी रुपयांच्या कामात भगवान पुरूषोत्तम व सहालक्षेश्वर मंदिर पाडकाम व पुनर्बांधणी, वावऱ्या, भक्तनिवास या कामांचा समावेश आहे. या मंदिरांचे दगडी बांधकाम चुण्यामध्ये करण्यात येणार आहे.

कसे जाल : माजलगावपासून कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय  महामार्गावर असलेल्या सावरगाव फाट्यावरून १२ किमीवर पुरुषोत्तमपुरी गाव आहे. 

टॅग्स :BeedबीडShravan Specialश्रावण स्पेशल