कोविड केअर सेंटरमध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करणार : बाळासाहेब आजबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:40+5:302021-04-10T04:33:40+5:30
ते तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या वेळी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...

कोविड केअर सेंटरमध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करणार : बाळासाहेब आजबे
ते तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या वेळी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, बाबूराव झिरपे, धर्मा जायभाये यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. आजबे म्हणाले की, कोरोनाकाळात राजकारण करणे योग्य नसून दिवसेंदिवस रुग्णांची वाढणारी संख्या पाहता शंभर टक्के लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. मी स्वत: या संकटाला सामोरा गेलो असल्याने त्याची जाणीव मला झाली. अनावश्यक कामासाठी बाहेर न पडण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. लोकांनी विनाकारण गर्दी करू नये, कोविडचा अनुभव फार कठीण आहे. दवाखान्यात सध्या बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे नागरिकांनी या कठीण काळात स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.
जलसंपदा विभागाचा आढावा घेताना ते म्हणाले की, तालुक्यातील पाणी प्रकल्पात असणाऱ्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या वेळी नायब तहसीलदार किशोर सानप, सहपोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह माजी नगरसेवक भीमराव गायकवाड, नशिर शेख, रवी आघाव, सावता कातखडे, गणेश मोरे, बाळासाहेब काटे यांची उपस्थिती होती.
चिंचपूर ते नवगण राजुरी या बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या राज्यमार्गाचे काम प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाले. परंतु गुत्तेदार लोकांच्या वादात एक ते दीड महिन्यापासून या रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय किरकोळ अपघातदेखील घडत असून धुळीमुळे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. सदरील बाब आमदार आजबे यांच्या लक्षात आणून देताच आजबे यांनी सोमवारपासून काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित गुत्तेदाराला फोनवरून दिल्या. जर काम सुरू केले नाही तर संबंधित एजन्सीची तक्रार करणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला.
===Photopath===
090421\vijaykumar gadekar_img-20210409-wa0040_14.jpg
===Caption===
कोविड केअर सेंटरला आ.बाळासाहेब आजबे यांनी भेट दिली. यावेळी सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख ,तहसिलदार श्रीराम बेंडे व अन्य