गोदावरी नदीपात्रातील पाणीउपसा करणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:06 IST2019-05-22T00:05:15+5:302019-05-22T00:06:20+5:30
दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

गोदावरी नदीपात्रातील पाणीउपसा करणाऱ्यांवर होणार कारवाई
बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, चोरट्या पद्धतीने भरमसाठ पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी गेवराई तहसीलदार यांनी पथकाची स्थापना केली आहे. यामुळे अवैध पाणी उपसा रोखता येणार आहे.
गेवराई तालुक्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात होता. दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोदावरीच्या पात्रातून माजलगाव धरणात काही दिवसांपुर्वी पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर बीड, माजलगाव या दोन्ही शहरांना व परिसरातील गावांना पाणी पुरवाठा केला जातो.
जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी माजलगाव धरणापर्यंत पोहचावे यासाठी नदी पात्रातील मोटारी व वीज बंद करण्यात आली होती. तरी देखील अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी पाच पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक उमापूर, धोडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळातील गोदापात्रालगतच्या गावांमध्ये गस्त घालून नदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
गस्त घालून कारवाई
गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रालगत होत असलेला पाणी उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांचे पथक नेमले.
हे पथक उमापूर, धोंडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळात गस्त घालून होणार कारवाई