परळीत पोलिसांकडून कारवाई, ५० हजार रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:35 IST2021-05-07T04:35:55+5:302021-05-07T04:35:55+5:30

परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दगडवाडी व धर्मापुरी येथे नाकाबंदी करण्यात आली तर ...

Action taken by police in Parli, fine of Rs. 50,000 recovered | परळीत पोलिसांकडून कारवाई, ५० हजार रुपयांचा दंड वसूल

परळीत पोलिसांकडून कारवाई, ५० हजार रुपयांचा दंड वसूल

परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील दगडवाडी व धर्मापुरी येथे नाकाबंदी करण्यात आली तर १५ गावात पोलिसांकडून गस्त घालण्यात आली. यावेळी विनामास्क फिरणाऱ्या १९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. व १० मोटार वाहन चालकाना दंड करून बेकायदा दुकान उघडे ठेवणाऱ्या १९ दुकान चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या तिघांना दंड करण्यात आला. एकूण ३१ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. तर शहरामध्ये शहर पोलिसांनी विना मास्कच्या दोन कारवाया करत एक हजार रुपये दंड केला. तर विनाकारण फिरणाऱ्या २६ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ५ हजार २०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती सपोनि खरात यांनी दिली. शहरातील संभाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी ३९ व्यक्तींवर कारवाई करीत ७ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.

फोटो : परळी ग्रामीण पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची वाहने आडवून दंडात्मक कारवाई केली यावेळी परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे व पोलीस.

===Photopath===

060521\img-20210504-wa0513_14.jpg

Web Title: Action taken by police in Parli, fine of Rs. 50,000 recovered